या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही लक्षणं दिसल्यास रुग्णालयात जावा .

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.१९ एप्रिल । मुंबई । देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, पण वेळेवर उपचार केले तर या आजरातून मुक्त होणाऱ्यांची संख्या पण जास्त आहे, कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतरही बरेच जण होम क्वॉरटाईन (Home Quarantine ) होउन घरीच उपचार घेत आहेत. कोरोनाचं संक्रमण (Corona infection) कमी असेल तर, घरी उपचार होउ शकतात. मात्र काही वेगळी लक्षण दिसत असतील तर, थेट रुग्णालयात दाखल होणंच चांगलं. ही लक्षणं असतील तर, दुर्लक्ष करु नका.

गोंधळणे, आळशीपणा, अस्वस्थता, अशक्तपणासारखी लक्ष रुग्णात दिसत असतील त्याला रुग्णालात दाखल करावे. ही लक्षण कोरोनोच्या गंभीर परिणामुळे ब्रेन फंक्शन आणि नर्वस सिस्टम मधील बिघाडामुळे दिसु शकतात. रुग्णाला कोणतीही गोष्ट करताना,बोलताना अडचणी येत असतील तर रुग्णाला उपचारांची गरज आहे.. .

छातीत होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या वेदनाकडे दुर्लक्ष करू नका. SARS-COV2 च्या अनेक प्रकरणांमध्ये फुप्फुसांच्या म्यूकोसल लाइनिंग (Mucosal Lining) हल्ला झाल्याचं दिसतं आहे. त्यामुळे रुग्णाला छातीत दुखणे,जळजळ होउ लागते.

श्वासोच्छवासाचा त्रास
श्वास घेण्यात अडथळे, छातीत वेदना ही गंभीर इन्फेक्शनची लक्षण आहेत. कोरोनाची लागण श्वसन संस्थेमधून होते. कोरोना आपल्या श्वासनलीकेवर हल्ला करुन अडथळा निर्माण करतो. चांगल्या पेशी डॅमेज झाल्यामुळे रुग्णाच्या जीवावर बेतू शकते.

कोरोना रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल घसरली असेल तर, रुग्णाला तत्काळा रुग्णालयात दाखल करावं. संसर्ग झाल्यावर रुग्णाच्या शरीराच्या ऑक्सिजन पातळीवर देखील वाईट परिणाम होतो. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या फुप्फुसांमध्ये द्रव पदार्थ वाढत जातो आणि ऑक्सिजन पातळी घसरते.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या ओठांवर आणि चेहऱ्यावर निळसरपणा येतो. हे शरीरातील ऑक्सिजनच्या पातळीवर परिणाम होण्याचे लक्षण आह. वैद्यकीय भाषेत (In Medical Terms) याला हायपोक्सिया म्हणतात. हायपोक्सियामध्ये (Hypoxia) आपल्या ऊतींना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, ज्यामुळे शरिर योग्यप्रकारे कार्य करू शकत नाही. कोरोनाची ही पाच गंभीर लक्षणं मानली जातात. जर ही लक्षणं तुम्हाला जाणवत असतील तर थेट रुग्णालय गाठा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *