अनुभवी माही च्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाशी सामना, अशी असेल Playing 11

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.१९ एप्रिल । आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) सोमवारी चेन्नई सुपर किंग्सचा सामना (Chennai Super Kings) राजस्थान रॉयल्सशी (Rajasthan Royals) होणार आहे. सीएसके टीमचं नेतृत्त्व अनुभवी महेंद्रसिंह धोनीकडं (MS Dhoni) असून तरुण विकेट-किपर बॅट्समन संजू सॅमसन (Sanju Samson) राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन आहे. या दोन्ही टीमनं पहिल्या पराभवानंतर दुसरी मॅच जिंकून स्पर्धेत पुनरागमन केलं आहे. आता हेच विजयी अभियान पुढं सुरु ठेवण्याचा या टीम प्रयत्न करणार आहेत.

राजस्थान रॉयल्सच्या बॅटींगची मदार ही कॅप्टन संजू सॅमसनसह जोस बटलर आणि डेव्हिड मिलरवर आहे. राजस्थानच्या तरुण बॅट्समननी या स्पर्धेत निराशा केली आहे. त्यांना हे अपयश सुधारण्याची एक संधी सोमवारी असेल. त्याचबरोबर ख्रिस मॉरीस हा राजस्थानचा ऑलराऊंडरही सध्या फॉर्मात आहे. मॉरीसला अन्य बॉलर्सनी साथ दिली तर चेन्नईच्या बॅट्समनची डोकेदुखी वाढू शकते.

चेन्नईच्या टीममध्ये मोईन अली आणि सुरेश रैना हे अनुभवी बॅट्समन फॉर्मात असले तरी महाराष्ट्राचा तरुण बॅट्समन ऋतुराज गायकवाड सध्या संघर्ष करत आहे. त्यामुळे या मॅचमध्ये गायकवाडच्या जागी रॉबिन उथप्पाचा समावेश होऊ शकतो. राजस्थानच्या टीममध्येही एक बदल होण्याची शक्यता आहे. पहिल्या दोन मॅचमध्ये अपयशी ठरलेल्या मनन व्होराच्या जागी यशस्वी जैस्वालला संधी मिळेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येतीय.

चेन्नई सुपर किंग्सची संभाव्य Playing 11 : महेंद्रसिंह धोनी, फाफ ड्यू प्लेसी, ऋतुराज गायकवाड/रॉबिन उथप्पा, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, सॅम करन, शार्दुल ठाकूर, ड्वेन ब्राव्हो आणि दीपक चहर

राजस्थान रॉयल्सची संभाव्य Playing 11 : संजू सॅमसन, जोस बटलर, मनन व्होरा/यशस्वी जैयस्वाल, डेव्हिड मिलर, शिवम दुबे, रियान पराग, राहुल तेवातिया, ख्रिस मॉरीस, जयदेव उनाडकत, चेतन सकारिया आणि मुस्तफिजुर रहेमान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *