महाराष्ट्र २४, मुंबई : सिनेमांची जेवढी पसंती आहे तेवढीच पसंती मालिकांनाही आहे. मालिका या वर्षानोवर्षे चालतात आणि प्रेक्षकांच्या मनात घर करतात. चित्रपटांसह मालिकांची लोकप्रियताही सर्वाधिक आहे. त्यामुळे विविध भाषांतील मालिका लोक आर्वजुन पाहतात. झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली आहे. पण, या मालिकेच्या चाहत्यांना नाराज करणारी ही बातमी आहे. ही मालिका लवकरच निरोप घेणार आहे.
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही ऐतिहासिक मालिका 25 सप्टेंबर 2017 ला सुरु झाली. अवघ्या दोन वर्षातच ती घराघरात पोहोचली आणि प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली. महाराष्ट्राचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण पुस्तकातून, चित्रपटातून अनेकदा पाहिला आहे. पण, संभाजीराजेंचं कतृत्व,शौर्य आणि त्यांचा गौरवशाली इतिहास या मालिकेने छोट्या पडद्यावर मांडला. प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आणि या मालिकेला त्यांनी डोक्यावर उचलुन घेतले.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये या मालिकेने 500 एपिसोड पूर्ण केले होते. पण,या फेब्रुवारीच्या अखेरीस ही मालिका चाहत्यांचा निरोप घेणार आहे. इतर मालिकांना मागे टाकत ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेने टीआरपीच्या चार्टमध्येही पाचवे स्थान पटकावले आहे.
एक प्रवास कधीच न विसरता येणारा…… pic.twitter.com/jrjgtZ9rVS
मालिकेमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी ही मालिका संपणार असल्याने एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यावर काही तासांतच, 12 हजारांपेक्षा जास्त व्हि्यूज मिळाले आहेत. शिवाय ‘एक प्रवास कधीच न विसरता येणारा’ असं कॅप्शनही दिलं आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली संभाजी यांची भूमिका, तसेच शंतनू मोघे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आणि प्राजक्ता गायकवाडने साकारलेली येसुबाईंची भूमिका यांनादेखील प्रेक्षकांचे तितकेच प्रेम मिळाले. या मालिकेची संपल्यावर कोणती नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटली येणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.