महाराष्ट्रात चाललंय काय? अश्लिल क्लिप दाखवून शिक्षकाचं विद्यार्थिनींशी विकृत वर्तन,

Spread the love

महाराष्ट्र २४ नांदेड : नांदेड जिल्ह्यातील शंकर नगर इथल्या शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच नांदेड जिल्ह्यात अशीच एक दुसरी घटना उघडकीस आली आहे. शहरा लगत असलेल्या विमनातळ पोलीस स्टेशन हद्दीतील शाळेतील एका शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत विकृत वर्तन केल्याचं समोर आलं आहे. 

स्वप्नील शृंगारे हा या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असून विद्यार्थिनींना बोलवून मोबाईलवर अश्लील चित्रफीत दाखवून त्यांच्यासोबत अश्लील चाळे करत होता. जर हा प्रकार कुणाला सांगितला तर शाळेच्या इमारतीवरुन खाली फेकून देईल अशी धमकीही त्याने विद्यार्थिनींना दिली होती.

याबाबत गावकऱ्यांनी पोलिसांत तक्रार केली असून आज शाळा बंद ठेवण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षक स्वप्नील शृंगारे याला ताब्यात घेतलं आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *