‘हर हर मोदी’ला, ‘घर घर केजरीवालचं’ उत्तर!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ; नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यातून सुपर ओव्हरमध्ये पोहोचला आहे. दिल्ली जिंकायचीच असा चंग बांधलेल्या भाजपनं आपली सगळी ताकद झोकून दिली आहे. भाजपकडून शाहीनबागचा मुद्दा उचलून धरत निवडणुकीला हिंदुत्वाचा रंग देत पुन्हा ‘हर हर मोदी’चा जप सुरू केलाय. तर केजरीवाल यांनी पाच वर्षात केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘घर घर केजरीवाल’चा नारा दिला आहे. आपली कामं दिल्लीच्या जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी केजरीवाल  यांनी एक भन्नाट कल्पना लढवली आहे. आपल्या देशाच्या राजकारणात पहिल्यांदाच अशा अनोख्या प्रयोगाच्या माध्यमातून एखादा राजकारणी  आपल्या कामाचा हिशेब देण्यासाठी आपल्या दारावर येतोय.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

www.welcomekejriwal.in या वेबसाइटच्या माध्यमातून दिल्लीच्या प्रत्येक नागरिकाच्या घरी पोहोचताहेत. या वेबसाइटवर तुम्ही गेलात तर आधी ते तुमच्या घरी येण्याची परवानगी घेतात. आपण परवानगी दिल्यास आपल्या पाच वर्षाच्या कामांचा हिशेब देण्यासाठी ते सज्ज होतात. पुढच्या पानावर पाच वर्षात त्यांच्या सरकारनं वेगवेगळ्या विभागात केलेलं काम तुम्हाला केजरीवाल सांगतात. त्या संदर्भातले सगळे व्हिडिओ वेबसाईटवर अपलोड केलेले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *