हळदीचे दूध पिण्याचे नेमके कोणते फायदे? वाचा याबद्दल अधिक !

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.२० एप्रिल ।

रोगप्रतिकारक शक्ती
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हळद अतिशय गुणकारी आहे. हळदीमध्ये अँटीव्हायरल, अँटीफंगल गुण असतात. ज्यामुळे सर्दी, ताप, खोकला यासारख्या विकारावर हळद गुणकारी ठरते.

वजन कमी होण्यास मदत
हळदीच्या दुधात कॅल्शियम असते. या व्यतिरिक्त बरेच खनिजेही आहेत. ते वजन कमी करण्यात मदत करतात. या कारणास्तव, हळदयुक्त पिले पाहिजे.

चांगली झोप
एक चिमूटभर हळद दुधात मिसळणे आपल्यासाठी फायदेशीर आहे. हळदीच्या दुधाचे आणखी फायदे करून घ्यायचे असतील, तर हळदीच्या पावडर ऐवजी कच्ची हळद दुधामध्ये घालून ते दुध प्यावे. हळदीयुक्त दुधाच्या सेवनाने चांगली झोप लागते.

सर्दी खोकला
हळदीयुक्त दूध पिल्यामुळे सर्दी आणि खोकला बरा होतो. हळदीच्या दुधात प्रतिजैविक पदार्थ असतात जे शरीराची शक्ती वाढवतात.

कर्करोग
हळदीचे दूध अनेक गंभीर आजारांशी लढण्यासाठी मदत करते. यामुळे ज्यांना कर्करोगाचा आजार आहे अशांनी दिवसातून एकदातरी हळद दूध घेतले पाहिजे.

हाडे
दुधामध्ये कॅल्शियम असते जे हाडे मजबूत बनवते. त्याचबरोबर हळदीमध्ये असलेल्या अँटीबायोटिक्समुळेही हाडे मजबूत होतात. म्हणून, हाडांच्या दुखापतीसाठी हळद असलेले दूध पिणे चांगले.

पीरियड्स
पीरियड्समध्ये महिलांना वेदना होत असतात. अशा परिस्थितीत हे हळद दुध फायदेशीर आहे. हळदीचे दूध पिल्यामुले वेदना कमी होण्यास मदत होते.

निरोगी हृदय
हृदय निरोगी ठेवण्यासाठीही हळद अतिशय प्रभावी ठरते. हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे आपले हृदय निरोगी राहण्यास मदत होते. हळदीचे दूध आपल्या रक्तातील साखरेची पातळी संतुलित करते.

(टीप : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. आपण आहाराबद्दल तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *