Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीमध्ये आज काहीशी घसरण , चांदीच्या दरात मात्र उसळी; वाचा आजचा भाव - Maharashtra 24

Gold Price Today: सोन्याच्या किंमतीमध्ये आज काहीशी घसरण , चांदीच्या दरात मात्र उसळी; वाचा आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.२० एप्रिल । सोन्याच्या किंमतीमध्ये आज काहीशी घसरण पाहायला मिळाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX Multi Commodity Exchange) वर जूनच्या वायदा सोन्याची किंमत 0.29 टक्क्यांनी कमी झाली आहे. तर चांदीमध्ये (Silver Price Today) काहीशी उसळी पाहायला मिळते आहे. मे महिन्यासाठी चांदीची वायदा किंमत (Silver Price) 0.45 ने वधारल्याचं पाहायला मिळालं आहे. एमसीएक्सवर मेच्या चांदीच्या वायदा किंमतीत 225 रुपयांची तेजी पाहायला मिळाली. यानंतर चांदीचे दर 68,635 रुपये प्रति किलोग्राम झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय मार्केटबद्दल बोलायचे झाल्यास अमेरिकन ट्रेजरीमध्ये आलेल्या मंदीदरम्यान सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळते आहे. आधीच्या सत्रात स्पॉट गोल्डची किंमत 0.2 टक्क्यांनी कमी होऊन 1,766.32 डॉलर प्रति औंस होती. ब्रोकरेजच्या माहितीनुसार 1725 डॉलर पेक्षा सोन्याचे दर कमी होणं मंदीचे संकेत असू शकतात.

मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याची जूनची वायदे किंमत 139 रुपयांनी कमी झाली आहे. यानंतर सोन्याचा दर प्रति तोळा 47,254 रुपयांवर पोहोचला आहे. आधीच्या सत्रात सोन्याचे दर 47850 या स्तरावर पोहोचले होते.

24 कॅरेट सोन्याचा भाव

Goodsreturns.in च्या मते 24 कॅरेट सोन्याबद्दल बोलायचं झालं तर दिल्लीमध्ये या शुद्धतेच्या सोन्याचा दर 50,630 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर 46080 रुपये प्रति तोळा आहे. तर कोलकाता आणि चेन्नईमध्ये हा भाव अनुक्रमे 49610 रुपये आणि 49040 रुपये प्रति तोळा आहे. हैदराबादमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 48610 रुपये प्रति तोळा असून बंगळुरुमध्ये हा दर 48610 रुपये प्रति तोळा आहे.

22 कॅरेट सोन्याचा दर

22 कॅरेट सोन्याबद्दल बोलायचं झालं तर दिल्लीमध्ये या शुद्धतेच्या सोन्याचा दर 46410 रुपये आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 45080 रुपये प्रति तोळा आहे. तर कोलकाता आणि चेन्नईमध्ये हा भाव अनुक्रमे 46910 रुपये आणि 44960 रुपये प्रति तोळा आहे. हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 44150 रुपये प्रति तोळा असून बंगळुरुमध्ये हा दर 44150 रुपये प्रति तोळा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *