तारक मेहता का उल्टा चष्मा असित मोदीं म्हणाले.. “शो मस्ट गो ऑन”

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.२१ एप्रिल । अनेक चाहते या मालिकेच्या दिग्दर्शकाला आणि निर्मात्यांना सोशल मीडियावर दिशाच्या वापसीबद्दल प्रश्न विचारत आहेत. अशात या शोचे निर्माते असित मोदी यांनी चाहत्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, ” दिशा बऱ्याच काळापासून या मालिकेशी जोडली गेलीय. आई झाल्यामुळे तिला काही विशेष सूट देण्यात आली होती. ती आणखी थोडा वेळ घेऊन शेमध्ये परत येऊ शकते.” याआधी देखील तिला गरोदरपणासाठी सुट्टी देण्यात आली होती. पुढे ते म्हणाले, “खूप कमी लोक असे असतात ज्यांना चाहत्यांचं प्रचंड प्रेम मिळतं. दिशाला तिच्या भूमिकेमुळे चाहत्यांचं प्रेम मिळालं. ती नशीबवान आहे. आशा आहे ती लवकच शोसाठी परत येईल. जर कौटुंबिक कारणांमुळे तिला हे शक्य होत नसेल तर तिच्या निर्णयचा आम्ही आदर करतो. ”

दिशा आली तर ठिक नाही तर…
पुढे असित मोदी म्हणाले, ” दिशा येवो किंवा न यवो मात्र मालिकेत दया बेन मात्र नक्की परतणार दिशा आली तर ठिक नाही तर शोसाठी दुसऱ्या दया बेनचा शोध घेतला जाईल. काही झालं तरी शो मस्ट गो ऑन.” असं ते म्हणाले. त्यामुळे आता मालिकेत दिशा वकानी परतली नाही तर तिची जागा एखादी दुसरी अभिनेत्री घेऊ शकते.

दिशा वकानी २०१७पासून मालिकेपासून लांब आहे. गर्भवती असताना तिने मालिकेतून ब्रेक घेतला होता. ४ वर्षे उलटली तरी देखील चाहते तिची प्रतिक्षा करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *