सीरमकडून व्हॅक्सीनचे नवीन रेट जारी; राज्यांसाठी दर 400 रुपये

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.२१ एप्रिल । सीरम इंस्टीट्यूटने बुधवारी कोवीशील्डसाठी नवीन किंमत ठरवली आहे. सीरमने म्हटले की, खासगी रुग्णालयांना कोवीशील्ड व्हॅक्सीन 600 रुपयांमध्ये दिली जाईल. यापूर्वी या रुग्णालयांना ही व्हॅक्सीन 250 रुपयांमध्ये दिली जात होती. राज्यांसाठी या व्हॅक्सीनच्या किंमती 400 रुपये असतील आणि केंद्राला पहिल्याप्रमाणे ही व्हॅक्सीन 150 रुपयमांमध्ये मिळेल. सीरमने म्हटले की, पुढच्या दोन महिन्यांत व्हॅक्सीनचे प्रोडक्शन वाढवले जाईल. सध्या जेवढ्या व्हॅक्सीन प्रोड्यूस होतात, त्यामध्ये 50% व्हॅक्सीन केंद्राच्या व्हॅक्सीनेशन प्रोग्रामसाठी पाठवल्या जातात. उर्वरीत 50% व्हॅक्सीन राज्य आणि प्रायव्हेट रुग्णालयांना पाठवल्या जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *