महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.२३ एप्रिल। मुंबई । विरार पश्चिम येथील विजय वल्लभ कोविड रुग्णालयात आग लागून 13 कोरोनाबाधितांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. या घटनेवरून राज ठाकरे यांनी सरकारला काही सवाल करून सूचनाही केल्या आहेत. (raj thackeray on virar covid fire incident)
राज ठाकरे यांनी ट्विट करून विरारमधील घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. आज विरार मधल्या हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. परवा नाशिकमधली घटना असो की काही दिवसांपूर्वीची भंडारा आणि भांडूपमधील घटना असोत, या घटना दुर्दैवी आणि क्लेशदायी आहेत, असं सांगतानाच सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य. पण म्हणून या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही असं नाही. सरकारने तातडीने जबाबदार अधिकाऱ्यांच्या टीम्स तयार करून, प्रत्येक रुग्णालयातील व्यवस्थांच, अग्निसुरक्षा यंत्रणांचं तात्काळ ऑडिट करून घ्यायला हवं. आणि ज्या त्रुटी आढळतील त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत, अशा सूचनाही राज यांनी केल्या आहेत.