Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Gold Price Today: सोन्याची पुन्हा 56,000 रुपये प्रति 10 ग्रॅमकडे वाटचाल ? पहा आजचा भाव - Maharashtra 24

Gold Price Today: सोन्याची पुन्हा 56,000 रुपये प्रति 10 ग्रॅमकडे वाटचाल ? पहा आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.२३ एप्रिल । सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये (Gold Silver Rate Today) मागील काही दिवसांपासून चढउतार पाहायला मिळत आहेत. सराफा बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये (Gold Price Today) आज तेजी आल्याचं चित्र आहे. तर, चांदीच्या किमतीदेखील वधारल्या आहेत. शुक्रवारी एमसीएक्स (MCX) सोन्याच्या किमतीत 0.23 टक्क्यांची वाढ झाली आहे. यानंतर सोन्याच्या जूनच्या वायद्याचे भाव 47,884 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहेत. चांदीच्या किमतीतही आज वाढ झाली आहे. चांदीचे दर 0.16 टक्क्यांच्या वाढीसह 69,329 प्रति किलोग्रॅमवर पोहोचले आहेत.

एचडीएफसी सिक्यूरिटीजनुसार, गुरुवारी दिल्लीमध्ये सोन्याचे दर 168 रुपयांनी घसरुन 47,450 प्रति 10 ग्रॅमवर आले. तर, चांदीचे दर 69,117 रुपये प्रतिकिलो इतके झाले.

सोन्याचे लेटेस्ट दर – सराफा बाजारात आज 10 ग्रॅम सोन्याच्या भावात 0.23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यानंतर जून वायद्याचे सोन्याचे भाव 47,884 प्रति दहा ग्रॅमवर पोहोचले आहेत.  मुंबईमधील भाव 45,250 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके आहेत.

जाणकारांच्या म्हणण्यानुसार सोन्याच्या किमतीत वाढ होण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्यानं येत्या काही दिवसात दरात तेजी पाहायला मिळू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *