IPL ; विराट 6000 रन्स काढणारा पहिला बॅट्समन ; दुसऱ्या स्थानावर हा विस्फोटक फलंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.२३ एप्रिल । भारतीय क्रिकेट कप्तान विराट कोहलीने (Virat Kohli) यापूर्वी क्रिकेटमधील अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आयपीएलच्या चालू हंगामात (IPL 2021) त्याने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध 72 रनांची नाबाद खेळी करत आयपीएलमध्ये सर्वाधिक 6 हजार धावांचा टप्पा (6000 Runs) ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव बॅट्समन ठरला आहे. तत्पूर्वी 6000 रनांचा टप्पा पार करण्यासाठी त्याला 51 धावांची गरज होती. त्याने आरसीबीकडून खेळताना राजस्थान रॉयल्सविरूद्ध (RCB vs RR) 72 रन्सची धमाकेदारी केळी करून आयपीएलमध्ये 6021 रन्स पूर्ण केल्या आहेत.

आयपीएलमधील विराट कोहलीचा हा 196 वा सामना होता. त्याने 38 च्या सरासरीने 6021 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 5 शतकांसह 40 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 क्रिकेट प्रकारात विराट कोहली सर्वाधिक 9874 धावा करणारा भारतीय बॅट्समन आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) 9203 धावांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्जचा सुरेश रैना (Suresh Raina) 5448 धावांसह दुसर्‍या क्रमांकांवर आहे. या व्यतिरिक्त शिखर धवन 5428 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहली हा आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी खेळाडू असला तरी, त्याचा संघ बंगळुरूला आतापर्यंत एकदाही विजेतेपद पटकवता आलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *