महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.२६ एप्रिल । मुंबई । भारतीय खाद्य हे जगातील सर्वात पौष्टिक मानले जाते. डाळी या आपल्या दैनंदिन आहाराचा मुख्य भाग असतात. डाळीमध्ये लोह, जस्त, जीवनसत्त्वे, सेलेनियम आणि लाइझिनसारख्या आवश्यक अमीनो अॅसिड असतात. हे कॅल्शियम शोषण्यास मदत करतात. तसेच यामुळे तुमची भूक नियंत्रणात राहते. उन्हाळ्याच्या हंगामात मूग, मटकी आणि लाल चवळीचा आहारात समावेश केला पाहिजे, कारण याचे पचन करणे फारच सोपे आहे. या डाळींमध्ये जीवनसत्त्वे आणि लोहयुक्त पदार्थ असतात. जी तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अधिक प्रभावी आहेत.
आपली प्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत होते. याशिवाय केस गळणे, पीसीओडी, सूज येणे, ताणतणाव आणि निद्रानाश यांच्याशी झुंज देणारे लोक यांनी जास्त करून मसूर आणि सोयाबीनचे सेवन केले पाहिजे. यामुळे आपली साखर पातळी देखील नियंत्रित राहते.न्याहारीमध्ये डाळीचा समावेश निरोगी आहार म्हणून केला जाऊ शकतो. न्याहारीमध्ये तुम्ही डोसा / अडाई / घावन तयार करू शकता.तुम्ही डाळी भाजून खाऊ शकता. स्नॅक / चाट म्हणून तुम्ही मसूर देखील वापरू शकता.
( टीप ; आरोग्य विषयक सामान्य माहिती आहे , उपचारांसाठी डॉक्टर आहार तज्ञ् यांचा सल्ला घ्या )