दिलासा दायक बातमी ; 30 एप्रिलपासून राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात होईल ; टास्क फोर्समधील डॉक्टरांचा अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.२७ एप्रिल। पुणे । 30 एप्रिलपासून राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात होईल. त्यानंतर आठवडाभराच्या कालावधीत नव्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर दोन्हीही कमी होतील, असा टास्क फोर्समधील डॉक्टरांचा अंदाज आहे. राज्यातील कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्णपणे ओसरेल, असे भाकीत टास्क फोर्समधील डॉक्टरांनी वर्तविले आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यभरात कोरोना रुग्णांची (Coronavirus in Maharashtra) संख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली होती. मात्र, या लाटेने उच्चांक गाठला असून आता रुग्णांची संख्या स्थिर होताना दिसत आहे. (Coronavirus Second wave in Maharashtra may decrease in first week of May)

मात्र, ही लाट ओसरल्यानंतर आपल्याला वेगाने लसीकरण करावे लागेल, असेही या तज्ज्ञांनी सांगितले. त्यासाठी राज्यातील प्रत्येक लसीकरण केंद्र साधारण 12 तास सुरु राहिले पाहिजे. पहिले सहा तास वृद्ध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण व्हावे. त्यानंतर 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण व्हावे. तरच कोरोना लसीकरणाचा अपेक्षित वेग गाठता येईल, असेही ‘टास्क फोर्स’च्या डॉक्टरांनी सांगितले.

कोरोना संसर्गाला आळा बसावा यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय योग्य ठरताना दिसत आहे. राज्यात आज तब्बल 15 दिवसांनंतर नव्या कोरोनाबाधितांचा आकडा हा 50 हजारांच्या खाली आहे. पुणे (Pune Corona Patients) शहरातही हा बदल बघायला मिळाला आहे. एकटच्या पुणे शहरात सलग आठव्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट झाल्याचं बघायला मिळालं आहे (Pune Corona Patients). पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवर याबाबत समाधान व्यक्त केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *