महाराष्ट्र २४ – मुंबई : १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी भारतीय जीवन विमा निगम (LIC) चे काही समभाग विकण्याची घोषणा केलीय. या घोषणेनंतर सामान्य गुंतवणुकदारांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत. विक्रीनंतर एलआयसी पॉलिसी धारकांच्या विम्याचं काय होणार? पॉलिसीचे पैसे कोण परत करणार? असे अनेक प्रश्न सामान्य गुंतवणूकदारांना पडलेत. त्यामुळेच ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बाजारातून पैसे मिळवण्यासाठी केंद्र सरकार कोणत्याही कंपनीचे समभाग विक्रीस काढू शकते. अशा वेळी, केंद्रात एलआयसीचा काही भाग विक्रीचा विचार करत आहे. परंतु, याचा पॉलिसी धारकांचं कोणतंही नुकसान होणार नाही. एलआयसीचे समभाग विक्रीस निघाले तरी विमाधारकांवर त्याचा थेट परिणाम होणार नाही. त्यामुळे विमा धारकांना घाबरण्याचं काहीही कारण नाही, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पॉलिसीचा काळ पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमचे पैसे अगोदरप्रमाणेच सहज काढू शकाल.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प २०२० सादर करताना भारतीय जीवन विमा निगम (LIC) आरंभिक सार्वजनिक निगम (IPO) द्वारे समभाग विक्रीची घोषणा केलीय.