बावधन परिसरात ठाणे – स्वारगेट बसने पेट घेतला

Spread the love

महाराष्ट्र २४- पुणे शहरात आज थराराक घटना घडली. राज्य परिवहन मंडळाच्या एका बसने भर रस्त्यात पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. बावधन परिसरात ही भयंकर घटना घडली. ही बस ठाणे ते स्वारगेट दरम्यान प्रवास करत होती.

बसने पेट घेतल्याचे समजताच प्रवासी तात्काळ बस बाहेर पडले. तर, अग्निशमन दलाची वाहनं देखील घटनास्थळी पोहचली असून, आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे. आसपासच्या परिसरात मोठ्याप्रमाणावर धूर निर्माण झाला आहे. शिवाय वाहतूकीची दुतर्फा कोंडी देखील झाली आहे. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *