स्मार्टफोनपेक्षा Nokia च्या फीचर फोनला जास्त मागणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- दिल्लीः नोकिया ब्रँडवर लोकांचा अद्याप विश्वास आहे. नोकियाच्या स्मार्टफोनपेक्षा ४ पट अधिक फीचर फोनची जास्त विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. नोकियाचे मोबाइल बनवणाऱ्या HMD Global कंपनीने २०१९ मध्ये १.२९ कोटी स्मार्टफोन शीपमेंट केली आहे. कंपनीने २०१९ मध्ये ५.३५ कोटी फीचर फोनची विक्री केली आहे. म्हणजेच कंपनीने गेल्यावर्षीच्या (२०१८) त्या तुलनेत ४ पट अधिक फोनची विक्री केली आहे.

२०१९ मध्ये स्मार्टफोनचा शीपमेंटमध्ये २७ टक्क्यांनी घट झाली आहे. कंपनीने २०१८ मध्ये १.७८ कोटी स्मार्टफोन बनवले होते. नोकियाचे स्मार्टफोनच्या विक्रीचे आकडेवारी काउंटरपॉइंट रिसर्चवरून NokiaMob ने सांगितले आहे. फीचर फोनमध्ये नोकियाचे २०१८ च्या तुलनेत कमी विक्री झाली आहे. एचएमडी ग्लोबने २०१८ मध्ये ६.४८ कोटी फीचर फोनचे उत्पादन केले होते. तिमाहीत नोकियाने २०१९ मध्ये चौथी तिमाहीत १.५ कोटी फीचर फोनचे उत्पादन केले होते. तर २०१८ मध्ये तिमाहीत १ टक्का अधिक होता. जर स्मार्टफोनचा विचार केला तर २०१९ मध्ये चौथ्या तिमाहीत कंपनीने २८ लाख स्मार्टफोनचे शिपमेंट केले आहे. २०१८ च्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत स्मार्टफोनच्या शीपमेंटमध्ये ४१ टक्के घसरण झाली आहे.

HMD Global ने २३ फेब्रुवारीला मोबाइल वर्ल्ड काँग्रेस (MWC) ने एका कार्यक्रमाची घोषणा केली आहे. बार्सिलोनामध्ये होत असलेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये कंपनी ३ हून अधिक वेगवेगवळे फोन लाँच करू शकते. कंपनी यावेळी Nokia 8.2, Nokia 5.2, Nokia 1.3 आणि ओरिजनल नोकिया सीरिज फोन लाँच करू शकते. यात Nokia 8.2 5G हा फोन सर्वात महागडा फोन असू शकतो. तसेच Nokia 5.2 स्मार्टफोनचे काही वैशिष्ट्ये लीक झाले आहेत. हा फोन बजेटमध्ये असण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये यूनिक कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. फोनच्या मागे एलईडी फ्लॅश सर्क्युलर कॅमेरा मॉडेल असणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *