Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
उद्या फैसला; पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा आमदार कोण? - Maharashtra 24

उद्या फैसला; पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा आमदार कोण?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.१ मे । राज्याचे लक्ष लागू राहिलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल उद्या (2 मे) आहे. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे, राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यासह 19 उमेदवार रिंगणात असले तरी यामध्ये भालके व आवताडे यांच्यातच मुख्य लढत होत असून, दोघांनीही विजयाचा दावा केला आहे. अपक्ष उमेदवारांनीही निकराची लढत दिल्यामुळे सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

आमदार भारत भालके यांच्या निधनाने ही पोटनिवडणूक होत आहे. वास्तविक पंढरपूर – मंगळवेढ्याची निवडणूक असली तरी राज्यातील महाविकास आघाडी व भाजप महायुतीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे. कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने संचारबंदी असूनही राज्यपातळीवरच्या नेतेमंडळींनी प्रचाराचे रान उठवल्याने पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघ आरोप प्रत्यारोपांनी ढवळून निघाला. विरोधकांच्या टोलेबाजीने पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा विषय राज्यपातळीवर गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *