कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा निर्णय ; भारतातून येणाऱ्या प्रवाशांना नो एन्ट्री

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.१ मे । भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत (Corona Cases in India) होणारी वाढ पाहाता अमेरिकेनं हवाई प्रवासावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. जो बायडेन प्रशासन पुढील आठवड्यापासून भारतातून येणाऱ्या प्रवाशांना प्रवेश बंदी (US Banned Travel from India) करत आहे. व्हाईट हाऊसनं शुक्रवारी सांगितलं, की अमेरिका 4 मेपासून भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालणार आहे. इतकंच नाही तर अशा लोकांनाही अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही, जे मागील 14 दिवसांत भारतात प्रवास करून आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होताना दिसत आहे. देशात कोरोनाचे अनेक प्रकारचे व्हेरियंट पसरत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीयांना प्रवेश बंदी करण्यात आली असून ४ मेपासून हा आदेश प्रभावी असेल, असं अमेरिकेनं म्हटलं आहे. याआधीही अमेरिकेनं आपल्या देशातील नागरिकांना भारतात न जाण्याचा आणि लवकरात लवकर देश सोडण्याचा सल्ला दिला होता.

भारतातील प्रवाशांवर बंदी घालणारा अमेरिका पहिला देश नाही. याआधीही ब्रिटन, इटली, जर्मनी, फ्रांस, यूएई, पाकिस्तान आणि सिंगापूरसह अनेक देशांनी अशाच प्रकारचे आदेश दिले आहेत. तर, दुसरीकडे कॅनडा, हाँगकाँग आणि न्यूझीलंडनंही भारतासोबतचे सर्व कमर्शियल प्रवास पुढे ढकलले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *