Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी घुंगराळा येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे रक्तदान शिबीर संपन्न ; वसंत सुगावे पाटील यांची माहिती - Maharashtra 24

कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी घुंगराळा येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे रक्तदान शिबीर संपन्न ; वसंत सुगावे पाटील यांची माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।संजीवकुमार गायकवाड नांदेड । दि.१ मे । नांदेड जिल्ह्यात कोरोना या संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढत असून या कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारासाठी रक्ताची गरज भासत आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार , उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार ,प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील , व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी केलेल्या आवाहानांनुसार राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी घुंगराळा येथे रक्तदान शिबाराचे आयोजन केले होते.

या रक्तदान शिबीरात 56 रक्तदात्यांनी रक्तदान केले.या रक्तदान शिबीरास गुरू गोबिंद सिंघ रक्तपेढी,नांदेड यांनी रक्तसंकलन केले.या रक्तदान शिबीरात नायगाव तालुक्यातील घुंगराळा,कुंटुर,शेळगाव, सातेगाव,कहाळा,कृष्णर,देगाव, मांजरम येथिल युवकांनी रक्तदान केले.

हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी राजेश ढगे,विलास ढगे, योगेश ढगे , रोहिदास ढगे, व्यंकट यलपलवाड, ज्ञानेश्वर सुगावे,खदीर शेख,शंतनू ढगे,सखाराम सुगावे,सोहेल शेख, नितीन बासाटवार,शुभम गबाळे,इसाक शेख, शंकर यमलवाड,उमेश कदम,अंकुश जलदेवार यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *