महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।मुंबई । दि.१ मे । मागील वर्षी कोरोनाच्या लाटेत होमिओपॅथीची मदत घेण्यात आली होती. साबुदाण्याच्या आकाराच्या होमिओपॅथीच्या सफेद गोळ्यांमुळे रुग्णाच्या रोगप्रतिकारशक्तीमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले होते. मात्र कोरोनाच्या दुसऱया लाटेत यंदा होमिओपॅथी उपचार पद्धती काही प्रमाणात मागे पडली. पण अॅलोपॅथीच्या उपचाराला होमिओपॅथीची जोड दिल्यास कोरोना नियंत्रणात येऊ शकेल, असा विश्वास होमिओपॅथी क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करीत आहेत.
कोरोना रुग्णांना झिंक, व्हिटॅमिन सीच्या गोळ्यांसोबत आयुर्वेदिक व होमिओपॅथी उपचार दिल्यास रुग्णाच्या तब्येतीला आराम पडेल. मागील वेळेस आर्सेनिक औषध दिले होते. कोरोनाच्या दुसऱया लाटेत ब्रायोनिया किंवा जेल्सेनियम ही होमिओपॅथीमधील औषधे दिली तर कोरोनावर फायदेशीर ठरेल.
– डॉ. राहुल जोशी, होमिओपॅथी तज्ञ