पोलार्डच्या वादळी खेळीत धोनी ब्रिगेड भुईसपाट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि.२ मे । रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पुन्हा दाखवून दिलं की स्कोअर कितीही मोठा असला तरी काय झालं?, आमच्याकडे जागतिक दर्जाचे सर्वोत्तम बॅट्समन आहेत, ज्यांच्याकडे कितीही मोठा स्कोअर चेस करण्याची क्षमता आणि प्रतिभा आहे. दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर शनिवारी खेळल्या गेलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या महामुकबल्यामध्ये रोहितच्या पलटणने धोनीच्या किंग्जला 4 विकेट्सने नमवून ऐतिहासिक कामगिरी केली. या सामन्यात बिग हिटर कायरन पोलार्डने (Kieron Pollard) चेन्नईची पळता भुई थोडी केली. (IPL 2021 Mi vs CSk MS Dhoni Rued Dropped Catches After Mumbai Indians Beat Chennai Super kings by 4 Wickets)

पोलार्डने चेन्नई विरुद्धच्या या सामन्यात 34 चेंडूत 6 फोर आणि 8 सिक्ससह 255.88 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 87 धावा चोपल्या. या दरम्यान पोलार्डने 17 चेंडूत अर्धशतक लगावलं. यासह पोलार्ड या 14 व्या मोसमात दिल्लीच्या पृथ्वी शॉला पछाडत कमी चेंडूत अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला. पृथ्वीने 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं.

पोलार्डने आपल्या खेळीत एकूण 8 सिक्स लगावले. त्यापैकी 3 सिक्स हे 90 मीटरपेक्षा अधिक लांबीचे लगावले. पोलार्डने 93, 97 आणि 105 मीटर लांबीचे गगनचुंबी सिक्स लगावले.

पोलार्डने बॅटिंगसह बोलिंगनेही कमाल केली. पोलार्डने मुंबईकडून या सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 2 ओव्हरमध्ये 12 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे पोलार्डने बॅक टु बॅक 2 विकेट्स घेतल्या. पोलार्डने फॅफ डु प्लेसीस आणि सुरेश रैना या घातक फलंदाजांना बाद केलं.

पोलार्डने या सामन्यात बोलिंगसह बॅटिंगने शानदार अष्टपैलू कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीसाठी पोलार्डला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासह पोलार्ड चेन्नई विरुद्ध मुंबईकडून सर्वाधिक 4 वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार घेणारा खेळाडू ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *