राशी भविष्य ; आज रविवार खंडोबाचा वार ; असा असेल तुमचा आजचा दिवस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि.२ मे ।

मेष – आज अधिकारी तुमच्या कामाने प्रभावित असतील.आर्थिक परिस्थिती सुधारेल. आनंददायी गोष्टींवर लक्ष द्या. महत्त्वाकांक्षा वाढेल.

वृषभ- मित्रांच्या मदतीने अडचणीतून बाहेर येण्याची संधी आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. कोणताही वाद असो, तो लवकरात लवकर मिटवण्याचा प्रयत्न कराल.

मिथुन- स्वत:ची काळजी घ्या. नवे कपडे खरेदी कराल. तुमच्या सक्रियतेचा स्तर वाढेल. जुन्या अडचणी दूर होतील.अडकलेलू कामं पूर्ण होतील. अनेक कल्पना सुचतील. खर्चांवर लक्ष ठेवा.

कर्क- आज कामं थोडी जास्त वेळासाठी चालतील. परिस्थिती तुमच्या पक्षात आहे.हाताशी जास्तीचा वेळ ठेवा. तुमचं मत स्पष्टपणे इतरांसमोर मांडा.

सिंह- आत्मविश्वासाचा फायदा होईल. सवयींवर लक्ष ठेवा. दिवस सर्वसामान्य असेलकोणा एका व्यक्तीसोबतचं नातं सुधारेल. जुन्या गुंतवणूकीचा तुम्हाला फायदा होईल.

कन्या- कोणत्याही गोष्टीची चिंता करु नका. एखादी शुभवार्ता मिळेल. भावनांमध्ये चढ- उतार जाणवेल. असे काही बेत आखाल ज्याचा येत्या दिवसांमध्ये फायदा होणार आहे.

तुळ- एखादी शुभवार्ता कळेल. व्यवसायात फायदा होईल. जमीन आणि देवाणघेवाणीच्या व्यवहारांत नशीबाची साथ असेल. कमीत कमी वेळात जास्त काम आटोपण्याचा प्रयत्न कराल.

वृश्चिक – धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीतील ताण दूर होईल.एखादं खास काम कुटुंबाच्याच मदतीने पूर्ण कराल. पूर्ण झालेल्या कामांचा फायदा होण्यास सुरुवात होईल.

धनु- चांगल्या गोष्टींसाठी वेळ द्या. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवसाचा आनंद घ्या. एखाद्या योजनेचा फायदा होईल. आज घेतलेल्या निर्णयांचे दूरगामी परिणाम दिसतील.

मकर- तुम्ही फार खर्च करता तो जपून करा. गरजेच्या वस्तूंवर खर्च करा. पैशांची चणचण भासणार नाही.सावधानी बाळगून खर्च करा. अचानक धनलाभ होऊ शकतो.

कुंभ- भावनांमध्ये चढ- उतार जाणवेल. कोणत्याही गोष्टीची चिंता करु नका.पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा. दिवस चांगला आहे. एखादी शुभवार्ता मिळेल. असे काही बेत आखाल ज्याचा येत्या दिवसांमध्ये फायदा होणार आहे.

मीन- दैनंदिन कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक गोष्टीला स्वत:च्या स्तरावर सोडवण्याचा प्रयत्न करा.आज तुम्हाला तुमचं महत्त्वं कळेल. राजकारणाच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्यांना एखादं मोठं पद मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *