तिसऱया संभाव्य लाटेत लहान मुलांमध्येही कोविड संसर्ग आढळण्याची शक्यता ; धोका टळलेला नाही ; सावध रहा ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.२ मे । कोरोनाच्या तिसऱया संभाव्य लाटेत लहान मुलांमध्येही मोठय़ा प्रमाणावर कोविड संसर्ग आढळण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी बोलून दाखविली आहे. त्यासाठी प्रशासनाने सज्जता ठेवावी. प्रत्येक पालिका क्षेत्रात येत्या काही दिवसांत ऑक्सिजन सुविधा उपलब्ध झालीच पाहिजे आणि यासाठी कुणावरही अवलंबून राहण्याची गरज पडू नये अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आदेश दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व महानगरपालिका, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांशी व्हीसीव्दारे बैठक घेऊन कोविडसंदर्भातील उपाययोजनांचा आढावा घेतला.सौम्य लक्षणांच्या घरीच विलगीकरणातल्या रुग्णांना नेमके कधी रुग्णालयांत हलवावे त्यामुळे वेळीच योग्य ते उपचार मिळून त्यांचे प्राण वाचू शकतील त्यासाठी एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष निर्माण करून ज्येष्ठ व निवृत्त डॉक्टर्सकडे रुग्णांच्या संपका&ची जबाबदारी द्यावी. येणाऱया तिसऱया संभाव्य लाटेत लहान मुलांमध्येही मोठया प्रमाणावर कोविड संसर्ग आढळण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी बोलून दाखविली असून प्रशासनाने त्याबाबतही आधीच नियोजन करावे.

गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील कोविडचा मुकाबला करतांना इतर रोगांच्या रुग्णांना सुद्धा वेळीच उपचार मिळणे अतिशय गरजेचे आहे. पावसाळ्यात हिवताप, कॉलरा, कावीळ, लॅपटो, डेंग्यू तसेच इतर साथीचे आजारही पसरतात, कोविडवर उपचार करतांना या नॉन कोविड रुग्णांसाठी सुद्धा कोविडपासून वेगळी स्वतंत्र व्यवस्था करावी.

रुग्ण संख्या स्थिरावलेली दिसते. धोका टळलेला नाही, पण येणाऱया तिसऱया लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ऑक्सिजनच्याबाबतीत प्रत्येक पालिका आत्मनिर्भर झालीच पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत ऑक्सिजनसाठी इतर कुणावरही अवलंबून राहता कामा नये, औषधांचा साठा, व्हेंटिलेटर्स पुरेशा संख्येने आहेत याची खात्री करून घ्या. यावेळी शहरांतील आगामी पावसाळी तयारी व संभाव्य आपत्तींशी मुकाबला करण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *