महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.२ मे । ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे. दिलीप कुमार यांनी रेग्युलर हेल्थ चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सायरा बानो यांनी दिली. दिलीप कुमार सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच आज रविवारी ते डिस्चार्ज होतील असेही सायरा बानो यांनी सांगितले.