महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.३ मे । पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थेच ठेवले आहेत. आज सलग १८ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर आहे. मात्र पश्चिम बंगालसह चार राज्यांची निवडणूक पार पडली असून लवकरच कंपन्यांकडून इंधन दरवाढीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव ७० डॉलरच्या दिशेनं वाटचाल करत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला देशात अनेक राज्यांमध्ये लॉकडाउन लागू झाल्याने इंधन मागणीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे कंपन्यांनी तूर्त इंधन दर जैसे थेच ठेवण्याला प्राधान्य दिले आहे.
आज सोमवारी मुंबईत पेट्रोलचा भाव ९६.८२ रुपयांवर स्थिर आहे. डिझेलचा भाव ८७.८१ रुपये आहे.दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.४० रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.८३ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.४३ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.७३ रुपये भाव आहे.