PUBG खेळणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! Battlegrounds Mobile India असणार नवीन अवतार

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. ७ मे । भारत आणि चीन यांच्यात तणावानंतर केंद्र सरकारने धाडसी निर्णय घेत चीनशी संबंधित असलेल्या ५९ अॅप्सवर बंदी घातली होती. त्यात पब्जी गेमिंग अॅपचाही समावेश होता. यानंतर देशभरातल्या लाखो पब्जी फॅन्सची निराशा झाली. मात्र, आता PUBG खेळणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून PUBG भारतात पुन्हा सुरू होणार आहे.

क्राफ्टन नावाची लोकप्रिय गेम निर्माता कंपनी लवकरच बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया अशा नावाने PUBG ला भारतात सादर करणार आहे. ज्याचा टीझर लाँच करण्यात आला आहे. PUBG Mobile बनवणाऱ्या दक्षिण कोरियन कंपनीने भारतीय वापरकर्त्यांसाठी हा गेम डिझाइन केला आहे. नवीन बॅटल रॉयल गेम हा पहिल्या पेक्षा अधिक प्रीमियम फीचर्सने सुसज्ज आहे. यात एक्सक्लुसिव्ह इन गेम इव्हेंटसारख्या आऊटफिट आणि फीचर्ससह AAA मल्टीप्लअर गेमिंग अनुभव मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

Battlegrounds Mobile India हे स्वतःच्या इकोस्पोर्ट सिस्टमद्वारे डेब्यू करेल, ज्यामध्ये टूर्नामेंट्स आणि लीग्सचा समावेश असेल. तसेच Battlegrounds Mobile India आपल्या घोषणे व्यतिरिक्त Krafton एक टीझर लाँच केला आहे ज्यामध्ये PUBG Mobile गेमशी समानता दिसून येते. दरम्यान गेल्या वर्षी भारतीय बाजारात अनेक चीनी अॅप्ससह PUBG Mobile गेमवर बंदी घालण्यात आली होती. ज्यामुळे लाखों पब्जी फॅन्सची निराशा झाली होती. त्यानंतर बर्‍याच दिवसांपासून PUBG खेळणारे PUBG री-लॉन्च होण्याची वाट पाहत होते. आता त्यांच्यासमोर PUBG चा एक नवीन पर्याय आला आहे.

Krafton सांगितले आहे की, Battlegrounds Mobile India भारतात अधिकृतपणे जाण्याआधी PUBG प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध असेल. भारतात या नव्या गेमला विशेष पद्धतीने लाँच करण्यात येणार आहे. तर या गेममधील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यात तिरंगा थीम असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *