कांद्याच्या भावात विक्रमी घसरण, शेतकऱ्यांना फटका

Spread the love

महाराष्ट्र २४- नाशिक : कांद्याच्या भावात विक्रमी घसरण झाली आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारण दोन दिवसांमध्ये कांद्याच्या भावात सातशे रुपयांची घसरण झालीय. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारण पंधरा हजाराच्या आसपास आवक झालीय, बाजार समितीत कांद्याचे सरासरी भाव १८०० रुपयांपेक्षा कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

गेल्या चार दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे. आवक वाढल्यामुळे कांद्याच्या दरावर परिणाम झालाय. परदेशातून आयात केलेला कांदा अजूनही जेएनपीटी बंदरात पडून आहे. त्यात राज्यातल्या कांद्याचीही आवक वाढली आहे. त्यामुळे दर मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत.  एका महिन्यात जवळपास साडेसहा हजाराच्या क्विंटलच्या आसपास भाव कमी झाला आहे. सरकारने निर्यात बंदी लवकरात लवकर न उठवल्यास भावात अजून घसरण होऊ शकते. लासलगाव, मनमाड, नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही कांद्याच्या दरात घसरण पाहायला मिळणार आहे.कांद्याला आज सरासरी प्रति क्विंटल  १८०० रुपये भाव मिळाला. शनिवारी कांद्याला  सरासरी प्रति क्विंटल २७०० रुपये भाव मिळाला होता. त्यात आज क्विंटल मागे झाली ९०० रुपयाची घसरण झाली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव उतरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *