सावधान! ‘करोना’बाबतचे ‘हे’ व्हायरल मेसेज खोटे

Spread the love

महाराष्ट्र २४- पुणे : ‘लसणाच्या पाकळ्या, कढीपत्त्याची पाने, गोमूत्र यांमुळे करोना व्हायरसवर उपचार शक्य आहे,’ असे संदेश डॉक्टरांच्या नावासह व्हॉट्सअँप वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र व्हायरल होणारे हे संदेश खोटे असून या संदेशावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

करोना आजारावर अद्याप कोणतेही रामबाण औषध नाही. अशा प्रकारचा दावा करणारे जे मेसेज व्हायरल होत आहेत, त्यात तथ्य नाही. यापूर्वी स्वाइन फ्लू, इबोला साथींच्या वेळी असे दिशाभूल करणारे मेसेज व्हायरल झाले होते. यावर सामान्यांनी विश्वास ठेवू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *