माईक हसीने दिली चेन्नई फ्रँचायजीला गुड न्यूज !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । चेन्नई । दि. ८ मे । ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मालदीवला पोहोचताच चेन्नईचा बॅटिंग कोच आणि ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू माईक हसीने (Mike Hussy) गुड न्यूज दिली आहे. काल त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत त्याचा कोरोना अहवाल नकारात्मक आला आहे. त्यांच्या तब्येतीविषयी चेन्नई फ्रँचायजीला काळजी लागून राहिली होती. अखेर चेन्नईने सुटकेचा निश्वास टाकलाय. 4 मेरी माईक हसीला कोरोनाची लागण झाली होती. त्याने केवळ 4 दिवसांतच कोरोनाविरुद्धची मॅच जिंकली आहे. (IPL 2021 Chennai Super Kings Batting Coach Mike hussy tested Covid Negative)

चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी पीटीआयला माईक हसीच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. पीटीआयशी बोलताना ते म्हणाले, 4 मे रोजी दिल्लीमध्ये माईक हसीला कोरोनाची लागण झाली होती. ज्यानंतर आयसोलेशन आणि डॉक्टरांच्या उपचारानंतर शुक्रवारी त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. पुढचे काही दिवस तो चेन्नईच्या एका हॉटेलमध्ये क्वारन्टाईन असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *