या महिलांच्या खात्यात केंद्र सरकार पाठवतंय 5 हजार रुपये, पाहा नोंदणी प्रक्रिया

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. ९ मे । आता पहिल्यांदाच गर्भवती महिलांसाठी (Pregnant women) जानेवारी 2017 मध्ये सुरू करण्यात आलेली पंतप्रधान मातृ वंदना योजना (Pradhan Mantri Matru Vandana Yojana- PMMVY ) वरदान ठरत आहे. केंद्र सरकार (Central government) गर्भवती महिलांच्या खात्यामध्ये 5000 रुपये जमा करत आहे. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

देशभरात महिला आणि नवजात बालकांच्या भविष्याबद्दल केंद्र सरकार अनेक महत्त्वाची पाऊलं उचलत आहे. गर्भवती महिला आणि नवजात बालकांच्या विकासाकडे लक्ष देत सरकारनं PMMVY ही योजना बनवली आहे. या योजनेंतर्गत गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना 5000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. 5000 रुपये तीन हप्त्यात दिले जातात. मात्र, 19 वर्षाच्या आतील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

Pradhan Mantri Matru Vandana योजनेंतर्गंत पहिल्यांदा गर्भवती झाल्यानंतर पोषणासाठी गर्भवती महिलेच्या खात्यात पाच हजार रुपये मिळतात. याचा पहिला हप्ता 1 हजार रुपये गर्भधारण झाल्यानंतर 150 दिवसांच्या आत मिळतो. दुसरा हप्ता 2000 रूपये 180 दिवसांच्या आत मिळतो. तर तिसरा हप्ता बाळाच्या जन्मानंतर त्याच्या पहिल्या लसीकरणाआधी मिळतो.या योजनेचा लाभ त्या महिलांना मिळतो ज्या दैनंदिन मजुरीचं काम करतात किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. याचा मुख्य उद्देश गर्भवती असताना मजुरी न करता आल्यानं झालेलं नुकसान काही प्रमाणात कमी करणं, हा आहे.

मातृत्व वंदना योजना 2021 अंतर्गत केंद्र सरकारनं नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. म्हणजेच लाभार्थी स्वतः ऑनलाईन नावनोंदणी करू शकतात. यासाठी सर्वात आधी लाभार्थ्याला www.Pmmvy-cas.nic.in या साईटवर लॉगिन करावं लागेल आणि आपलं नाव नोंदवावं लागेल. ही प्रकिया ऑनालाईन असल्यानं आपण घरबसल्या इंटरनेटच्या माध्यमातून अगदी सहज रजिस्ट्रेशन करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *