‘जीएसटी’ मुळे लसींच्या किमती कमी राहण्यात मदत मिळते.; केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारमण यांचे स्पष्टीकरण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. १० मे । कोरोना लस आणि संबंधित औषध यांच्यावरील टॅक्ससंदर्भात होणाऱ्या टिकेला केंद्रीय वित्तीय मंत्री निर्मला सितारामण यांनी रविवारी प्रतिउत्तर दिले. त्या म्हणाल्या की, “कोरोना लसीवर ५ टक्के आणि ऑक्सिजन व कोरोना औषधांवर १२ टक्के टॅक्स गरजेचा आहे. यामुळे त्यांची किंमत कमी होण्यास मदत मिळेल”, असे स्पष्टीकरण सितारमण यांनी दिले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोरोना संकट आणि दरम्यानच्या औषधे आणि इतर वस्तुंवर टॅक्स माफ करण्याची मागणी केली होती. त्यावर निर्मला सितारामण यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्या म्हणाल्या की, “लस आणि औषधांवरील सामान्य टॅक्समधून निर्मिती कंपन्यांना इनपुच टॅक्स क्रेडिट मिळते. यातून त्यांना लसींच्या किमती कमी राहण्यात मदत मिळते.”

“लशींवर आकारलेल्या जीएसटीचा निम्मा वाटा केंद्राला आणि निम्मा वाटा राज्याला मिळतो. केंद्राच्या वाटय़ातील ४१ टक्के वाटा पुन्हा राज्यांना दिला जातो. याचा अर्थ लशींवरील जीएसटीद्वारे केंद्राला मिळालेल्या महसुलापैकी जवळपास ७० टक्के महसूल राज्यांना मिळतो. राज्य सरकार, सेवाभावी संस्था, स्वायत्त संस्था यांनी नि:शुल्क वितरणासाठी आयात केलेल्या वस्तूंवरील ‘आयजीएसटी’ही माफ करण्यात आला आहे”, अशी माहिती सितारामण यांनी दिली.

संस्थांकडून दान म्हणून मिळणाऱ्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, प्राणवायू सिलिंडर्स, साठवणूक टाक्या, करोना औषधे इत्यादींवरील जीएसटी आणि सीमाशुल्क अर्थात आयात कर माफ करण्याची मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यांच्या पत्राला उत्तर देताना अर्थमंत्र्यांनी, या वस्तूंवरील सीमाशुल्क आणि आरोग्य उपकर आधीच माफ केला गेल्याचे ट्वीट केले. त्याचबरोबर इंडियन रेडक्रॉसने नि:शुल्क वितरणासाठी आयात केलेल्या करोनाशी संबंधित सर्व साहित्यावरील ‘आयजीएसटी’ही माफ करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *