महिंद्राची सर्वात स्वस्त इलेंक्ट्रिक कार लाँच

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑटो एक्स्पो 2020 च्या पहिल्या दिवशी महिंद्रा कंपनीने भारताची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार ‘महिंद्रा ईकेयूव्ही100’ लाँच केली आहे. या कारची एक्सशोरुम किंमत 8.25 लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे. या कारमध्ये कंपनीने दमदार बॅटरी दिली आहे. दिसायला महिंद्रा ई केयूव्ही100 जवळपास आपल्या पेट्रोल व्हर्जन सारखीच आहे. या कारमध्ये दुसरे स्टायलिश ग्रिल, हेडलॅम्प्स आणि टेललाइट्स मिळण्याची शक्यता आहे.

कंपनी कारच्या इंटेरिअरमध्ये देखील कोणतेही मोठे बदल करणार नाही. मात्र इलेक्ट्रिक कारमध्ये डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोलच्या जागी मोठे इंफोटेनमेंट सिस्टम दिले जाऊ शकते.

महिंद्राच्या नवीन केयूव्ही100 मध्ये 40 kwh इलेक्ट्रिक मोटर दिली जाईल, जी 53बीएचपी पॉवर आणि 120 एनएम टॉर्क जनरेट करते. कारमध्ये सिंगल-स्पीड ट्रांसमिशन देण्यात येईल, जे कारच्या पुढील व्हिल्सला पॉवर देईल. कारमध्ये 15.9 Kwh लिथियम-आयन बॅटरी देण्यात येईल. सिंगल चार्जमध्ये ही कार 120 किमी अंतर पार करू शकते.
या कारसोबत कंपनी सामान्य आणि फास्ट चार्जर पर्याय देऊ शकते. ही कार भारताची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असून, राज्य सरकारच्या नियमांमुळे कारची किंमत अजून कमी होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *