केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये ७ लाख पदे रिक्त

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये ६.८३ लाख पदे रिकामी असल्याची माहिती कार्मिक खात्याचे मंत्री जितेंद्र सिंग यांनी बुधवारी लोकसभेत लेखी उत्तरादाखल दिली. केंद्र सरकारच्या अखत्यारितील मंजूर पदांची एकूण संख्या ३८ लाख २ हजार ७७९ इतकी असून १ मार्च २०१८ रोजीच्या आकडेवारीनुसार ३१ लाख १८ हजार ९५६ कर्मचारी कार्यरत असल्याचे सिंग यांनी उत्तरात नमूद केलेले आहे. 

सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू, पदोन्नती आणि इतर कारणांमुळे सरकारी खात्यांतील जागा रिक्त होत असतात. गरजेनुसार यातील जागा भरल्याही जातात, असे सांगून सिंग पुढे म्हणतात की, रिक्त जागांवर नियमांनुसार भरती करणे, ही नियमित प्रक्रिया आहे. चालू आर्थिक वर्षात केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे युपीएससी, स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे एसएससी आणि रेल्वे भरती बोर्डाने १.३४ लाख पदांची भरती करण्याची शिफारस केलेली आहे. यातील सर्वाधिक १ लाख १६ हजार ३९१ पदे रेल्वे भरती बोर्डामार्फत भरली जाणार असून १३ हजार ९९५ जागा स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे तर उर्वरित ४३९९ जागा युपीएससीद्वारे भरल्या जाणार आहेत. सध्या स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे भरती बोर्ड, पोस्टल सेवा बोर्ड आणि संरक्षण मंत्रालयाकडून ३ लाख १० हजार ८३२ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरु आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *