पेट्रोल, डिझेलच्या दर वाढ सुरूच

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १५ मे । देशात या आठवड्यात इंधनाच्या दरात चौथ्यांदा वाढ करण्यात आल्याने शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झाली. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २९ पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर ३४ पैसे वाढ करण्यात आली आहे.
या दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर ९२.३४ रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर ८२.९५ रुपये इतका झाला आहे. महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेशातील काही शहरांमध्ये इंधनाच्या दराने अगोदरच शंभरी पार केली आहे. मुंबईत आता पेट्रोलचा दरप्रतिलिटर ९८.६५ रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर ९०.११ रुपये इतका झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *