केएल राहुलच्या फॉर्ममुळे अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचे करिअर धोक्यात !

Spread the love

महाराष्ट्र २४- हॅमिल्टन : न्यूझीलंड दौऱ्यात टीम इंडियाचा फलंदाज केएल राहुल (KL Rahul) चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. टी-20 मालिकेत सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरल्यानंतर एकदिवसीय सामन्यातचाही शुभारंभ दणक्यात केला. केएल राहुलनं हॅमिल्टन येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यात 64 चेंडूत 88 धावांची जबरदस्त कामगिरी केली. या तुफानी खेळीत राहुलनं 3 चौकार आणि 6 षटकार लगावले. आपला 30वा एकदिवसीय सामना खेळताना राहुलने 7वे अर्धशतक पूर्ण केले. न्यूझीलंडच्या भुमीवर राहुलचे हे पहिले अर्धशतक आहे.

धोनीच्या परतीचे दरवाजे बंद ?

केएल राहुलने सलग दुसर्‍या वन डे सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाज करत अर्धशतक ठोकले. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत राहुलने राजकोटमध्ये 52 चेंडूत 80 धावा केल्या. टीम इंडिया व्यवस्थापनाने केएल राहुलला फिनिशरची जबाबदारी दिली आहे, जी त्याने सलग दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये योग्य सिद्ध झाली. केएल राहुलचा फिनिशर म्हणून या दोन डावांमुळे एमएस धोनीच्या परतीचा मार्ग कायमचा थांबू शकतो. कारण केएल राहुलदेखील यष्टीरक्षण करत आहे. तर कधी सलामीवीर आणि आता त्याला फिनिशरचीही भूमिका देण्यात आली आहे. केएल राहुल जर तीनही भूमिका साकारण्यात यशस्वी ठरला महेंद्रसिंग धोनीला संघात जागा मिळणे कठिण होईल, इतकेच नव्हे तर धोनीचा उत्तराधिकारी समजल्या जाणार्‍या ऋषभ पंतसाठीही राहुल हा धोका बनला आहे. त्याचबरोबर संजू सॅमसन, दिनेश कार्तिक, शिखर धवन यांचेही दरवाजे राहुलने जवळ जवळ बंद केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *