DRDOचे मोठे शस्त्र, अँटी कोविड औषध आज बाजारात होणार लॉन्च

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १७ मे । कोरोनाविरुद्धच्या लढाईत निर्णायक भूमिका बजावण्यासाठी डीआरडीओचे अँटी कोविड औषध, 2 डीजी (2DG) आज 17 मे पासून रुग्णांना उपलब्ध होणार आहे. सोमवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Harsh Vardhan) या औषधाला बाजारात लॉन्च केल्याची घोषणा करणा आहेत. त्यानुसार हे औषध आजपासून बाजारात उपलब्ध होईल. या औषधामुळे कोरोनाविरोधातील लढ्याला मोठे यश येणार आहे.

औषध पावडर स्वरूपात उपलब्ध असेल
डीआरडीओच्या म्हणण्यानुसार, हैदराबादच्या रेड्डी लॅबच्या डॉक्टरांच्या सहकार्याने ‘2DGऑक्सी-डी-ग्लूकोज’ हे औषध न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस (INMAS)संस्थेने तयार केले आहे. अलीकडेच, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने(DCGI) क्लिनिकल चाचणी करुन आणीबाणीद्वारे या औषधाच्या वापरास मान्यता दिली. असे सांगितले जात आहे की हे औषध पावडरमध्ये उपलब्ध असेल. म्हणजेच, रुग्णांना ते पाण्यात विरघळवून ते प्यावे लागेल.

या औषधाने ऑक्सिजनची पातळी कायम राहील
अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की ग्लूकोजच्या आधारे या औषधाच्या सेवनामुळे कोरोना रुग्णांना ऑक्सिजनवर जास्त अवलंबून राहावे लागणार नाही. तसेच ते लवकरच बरे होतील. क्लिनिकल चाचणीच्या वेळीही कोरोना रूग्णांना हे औषध देण्यात आले आहे. त्यांचा आरटी-पीसीआर (RT-PCR) अहवाल लवकरच निगेटिव्ह येण्यास मदत होणार आहे. त्यांनी सांगितले की, हे औषध विषाणूद्वारे थेट प्रभावित झालेल्या पेशींमध्ये जमा होते आणि विषाणूचे संक्रमण आणि ऊर्जा उत्पादन थांबवून व्हायरसला रोखते. हे औषध सहज तयार केले जाऊ शकते. म्हणजे लवकरच ते संपूर्ण देशात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *