पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार !

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १७ मे । पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पंम्पिंग स्टेशनवरील काही तांत्रिक दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवार २० मे रोजी दिवसभरासाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.तर दुसर्‍या दिवशी २१ मे शुक्रवारी उशिरा पण कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत माहिती देण्यात आली.

दरम्यान, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांपैकी एक असलेल्या टेमघर धरणाच्या दुरुस्तीला करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांचा फटका बसला आहे. कामगार आणि बांधकाम साहित्याची वानवा असल्याने यंदा दुरुस्तीची कामेच होऊ न शकल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, राज्य शासनाने धरण दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात २५ कोटींची तरतूद के ली असून या निधीतून कमी कालावधीतील गळती प्रतिबंधक कामे पूर्ण करणे, तर दीर्घ कालावधीच्या कामांचे नियोजन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *