रेल्वेच्या ‘या’ 10 गाड्या पुढच्या आदेशापर्यंत रद्द, पाहा संपूर्ण यादी

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १८ मे ।रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची घटती संख्या लक्षात घेता भारतीय रेल्वेने अलीकडेच अनेक गाड्यांचे परिचालन थांबवले. आता रेल्वे अनेक मार्गांवरील गाड्यांची संख्या कमी करीत आहे. (indian railway cancelled these 10 trains of eastern railway full cancelled list)

या क्रमवारीत भारतीय रेल्वेने पूर्व रेल्वेच्या 10 गाड्या रद्द केल्यात. रेल्वेने पुरी, सियालदाह, कोलकाता आणि हावडा या मार्गावरील 10 विशेष गाड्यांच्या फेऱ्या थांबविण्याचा निर्णय घेतला. आपण या मार्गावर प्रवास करणार असाल किंवा या गाड्यांचे आपल्याकडे तिकीट असेल तर आपण काळजी घेणे आवश्यक आहे. या 10 गाड्यांमध्ये कोणत्या ट्रेनचा समावेश आहे, हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत, पुढील ऑर्डरपर्यंत त्यांच्या फेऱ्या थांबवण्यात आल्यात.

10 गाड्यांमधील अनेक गाड्या 20 मे रोजी धावणार होत्या
या 10 गाड्यांमधील अनेक गाड्या 20 मे रोजी धावणार होत्या. तसेच 21 मे, 19 मे, 24 मे, 25 मेपासून अनेक गाड्या धावणे थांबवले जाईल. खाली सर्व गाड्यांची नावे पाहा आणि त्यांची सेवा कधी थांबणार आहेत, त्याची यादी बघा.
1. सियालदाह-न्यू जलपाईगुड़ी स्पेशल – 20 मे 2021
2. न्यू जलपाईगुडी – सियालदाह – 21 मे 2021
3. सियालदाह – पुरी स्पेशल – 19 मे 2021
4. पुरी – सियालदाह विशेष – 20 मे 2021
5. कोलकाता – हल्दीबारी विशेष – 20 मे 2021
6. हल्दीबारी – कोलकाता स्पेशल – 21 मे 2021
7. कोलकाता – सिलघाट स्पेशल – 24 मे 2021
8. सिलघाट- कोलकाता स्पेशल – 25 मे 2021
9. हावडा – बालूरघाट स्पेशल – 19 मे 2021
10. बालूरघाट-हावडा विशेष – 19 मे 2021

रेल्वेने 34 विशेष गाड्यांच्या सेवेचा विस्तार केलाय. म्हणजे या क्षणी या गाड्या थांबविल्या जाणार नाहीत. पूर्व मध्य रेल्वेचे सीपीआरओ राजेश कुमार म्हणाले की, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता वांद्रे टर्मिनस, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद, सूरत इत्यादीपासून मध्य रेल्वेच्या समस्तीपूर, मुझफ्फरपूर, दानापूर, बरौनी या स्थानकांसह इतर स्थानकांसाठी या गाड्या चालवल्या जात आहेत. धावणाऱ्या विशेष गाड्यांच्या 17 जोड्यांच्या ट्रिपमध्ये वाढ झाली. त्याच वेळी यापूर्वी उत्तर रेल्वेच्या फिरोजपूर विभागाने 8 जोड्या अनारक्षित मेल एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या गाड्याही अत्यल्प प्रवाशांमुळे बंद करण्यात आल्यात. कमी प्रवाशांमुळे ईशान्य रेल्वेने 12 मे ते 17 मे या कालावधीत एकूण 31 गाड्या रद्द केल्यात. ईशान्य सीमेवरील रेल्वेने आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहार दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्या रद्द केल्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *