इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा झटका; भारताविरुद्ध हा गोलंदाज खेळणार नाही

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० मे । भारताविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी इंग्लंड संघाला मोठा झटका बसला आहे. चार ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या मालिकेतून इंग्लंडचा जलद गोलंदाज जोफ्रा आर्चर जवळ जवळ बाहेर झालाय. भारत दौऱ्यावर असताना आर्चरला दुखपत झाली होती. त्यानंतर तो काही दिवस मैदानाबाहेर होता. पण काउंटी क्रिकेटमध्ये खेळताना त्याच्या दुखापतीने पुन्हा डोकं वर काढले. आर्चरच्या कोपराला दुखापत झाली होती. आता ताज्या अपडेटनुसार आर्चरवर शुक्रवारी शस्त्रक्रिया होणार आहे. या शस्त्रक्रियेनंतर त्याला मैदानावर परतण्यास मोठा कालावधी लागू शकतो.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, जोफ्रा आर्चरच्या दुखापतीसंदर्भात डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. ती शुक्रवारी होईल. दुखापतीमुळेच आर्चर न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून याआधीच बाहेर झालाय.काउंटी चॅम्पियनशिपमध्ये ससेक्स संघाकडून खेळताना आर्चरच्या दुखापतीतून डोकवर काढले. आर्चरला ब्लॅक कॅप्स ही दुखापत झाली आहे. गोलंदाजी करताना त्याला याचा त्रास होतोय. या वर्षी भारताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यात आर्चरला दुखापतीमुळे खेळता आले नव्हते. त्यानंतर आयपीएलच्या १४व्या हंगामात दोखील तो खेळू शकला नव्हता.

आर्चरवर मार्च महिन्यात देखील शस्त्रकिया झाली होती. घरी असलेल्या फिस टॅकची सफाई करताना आर्चरला दुखापत झाली होती. तेव्हा त्याच्या हातातून काचेचा तुकडा काढला होता. इंग्लंडला भारताविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची असल्याने आर्चर नसल्याने त्यांना फटका बसू शकतो.आर्चर इंग्लंडचा मुख्य गोलंदाज असून त्याने आतापर्यंत १३ कसोटीत ४२ विकेट घेतल्या आहेत. तर १७ वनडे ३० आणि १२ टी-२० मध्ये १४ विकेट घेतल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *