वय वर्ष 45 फलंदाजाने रचला इतिहास ! 30 बॉलमध्ये 150 धावा करण्याचा विक्रम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ मे । काउंटी चॅम्पियशिपदरम्यान एका फलंदाजानं अनोखा विक्रम केला आहे. या फलंदाजाने आपल्या पार्टनरला केवळ एकच रन काढण्याची संधी दिली आणि उर्वरित धावा त्याने एकट्याने पूर्ण केल्या आहेत. डबल सेंच्युरी थोडक्यात हुकली पण एक शतक आणि दुसरं अर्धशतक देखील त्याने केलं. या फलंदाजाचं विक्रम पाहून सर्वजण अवाक झाले.

45 वर्षांच्या डॅरेन स्टीवन्स यांनी मैदानात कमाल केली आपल्या फलंदाजीनं वादळ आणलं. स्टीवन्सने चौकारांच्या मदतीनं 30 चेंडूमध्ये 150 धावा केल्या. तर आपल्या सोबतच्या फलंदाजाला केवळ एकच रन काढू दिला. कॅन्टबरी विरुद्ध ग्लॅमोर्गन खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑलराऊंडर डॅरेन स्टीवन्स याने आपल्या तुफानी खेळीनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर स्टीवन्सचं जोरदार कौतुकही करण्यात आलं.

या फलंदाजाने 190 धावा 149 चेंडूमध्ये केल्या आहेत. त्यापैकी 15 चौकार आणि 15 षटकार ठोकले आहेत. 128च्या स्ट्राईक रेटनं 190 धावा वयाच्या 45 व्या वर्षी सामन्यादरम्यान करणं खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्या या फलंदाजीचं कौतुक जगभरात होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *