रामदेव बाबा यांच्याविरोधात कारवाई करण्याची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी ; अ‍ॅलोपॅथीविरोधात वक्तव्यामुळे IMA संतप्त,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २२ मे । योगगुरू रामदेव बाबा यांच्या अ‍ॅलोपॅथीविरोधातील वक्तव्यावर इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आयएमएने योगगुरू रामदेव बाबा यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याकडे केली आहे. दरम्यान, रामदेव बाबा यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ज्यामध्ये ते अ‍ॅलोपॅथीविरूद्ध बोलत आहेत.

तर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेल्या त्या व्हीडिओमध्ये रामदेव बाबा हे अ‍ॅलोपॅथीला ‘एक स्टुपीड’ आणि ‘दिवाळखोर विज्ञान’ म्हणून संबोधत आहेत. ते त्यात म्हणतात की, अ‍ॅलोपॅथी हे एक मूर्ख आणि दिवाळखोर विज्ञान आहे. आधी मोरोक्विन अयशस्वी झाले. त्यानंतर रेमडेसिवीर अयशस्वी ठरले. यानंतर त्यांचे प्रतिजैविके (स्टिरॉईड्स) अयशस्वी ठरली. इतकेच काय तर प्लाझ्मा थेरपी वरही बंदी घालण्यात आली आहे. तापासाठी जे फॅबिफ्ल्यू दिले जात होते तेही अयशस्वी ठरले आहे. जितकी औषधे दिली जात आहेत ती सर्व अयशस्वी ठरली आहेत. हा काय तमाशा आहे?

शनिवारी याच संदर्भात मेडिकल असोसिएशनने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले. ज्यात आरोग्यमंत्र्यांनी रामदेव बाबा यांचा आरोप मान्य करावा. तसेच आधुनिक आरोग्य सुविधा रद्द कराव्यात. नसेल तर यांच्यावर महामारी रोग अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करावा. तसेच त्यांच्यावर खटला चालविला जावा, असं म्हटले आहे.

तसेच रामदेव बाबा यांच्यावर कारवाई न केल्यास आयएमएला त्यांवर कायदेशीर कारवाई करावी लागेल असा इशारा ही आयएमएने आपल्या निवेदनात दिला आहे. तसेच या निवेदनात, बाबा रामदेव हे आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित असे योग गुरू आहेत. तसेच ते एका औषधी कंपनीशी संबंधितही आहेत. तर लोकांची दिशाभूल करण्यासाठी ते आपल्या औषध कंपनीच्या उत्पादनांविषयी खोटे बोलताना पाहिले गेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *