Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार? - Maharashtra 24

मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २५ मे ।करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १ जूनपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला असून सर्वसामान्यांवर कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसल्यानंतर राज्य सरकारकडून पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी लोकल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान लोकलमध्ये होणारी गर्दी पाहता सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकलचे दरवाजे अजून पुढील १५ दिवसांसाठी उघडले जाणार नाहीत अशी शक्यता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“लोकल ट्रेनमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्य नाही. त्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरु राहतील,” असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *