महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २५ मे । बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने आएमए आणि फार्मा कंपन्यांना २५ प्रश्नांच लेटर बॉम्ब टाकला आहे. बाबा रामदेव यांनी लिहलेल्या पत्रात हिपेटीटीस, लिवर सोयरासीस, हृदयविकार, शुगर, लिवर, थॉयराईड, ब्लॉकेज, बायपास, मायग्रेन, पायरीया, निद्रानाश, तणाव, व्यसनाधिनता, क्रोध यासह अन्य विषयांवर बाबा रामदेव यांनी फार्मा आणि आयएमएला प्रश्नांचा भडीमार केला आहे.
बाबा रामदेव आणि आयएमए यांच्यातील वाद काही संपायचे नाव घेत नाही. बाबा रामदेव यांनी रविवारी आयएमएवर केलेले व्यक्तव्य मागे घेत खेद व्यक्त केला होता. दरम्यान सोमवारी पुन्हा बाबा रामदेव यांचा नवीन एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात ते लोकांकडून योगा करून घेताना डॉक्टरांची चेष्टा करताना दिसत आहेत.
बाबा रामदेव यांनी विचारलेल्या २५ प्रश्नांमध्ये फार्मा कंपन्या तसेच डॉक्टरांवर निशाणा साधला आहे.
१) हायपरटेन्शन (बीपी) आणि त्याच्या संबंधित असलेल्या आजारावर कायमस्वरूपी समाधान आहे का?
२) अॅलोपॅथीमध्ये मधुमेहासंबंधी योग्य उपचार करणारे औषध आहे का? त्याच्यावर कायमस्वरूपी उपाय काय?
३) अॅलोपॅथीमध्ये लिव्हर, लिव्हर सोयरासीस, हिपॅटायटीस यावर कोणते औषध आहे, टीबीसारख्या आजारांवर कायमचा उपाय आहे का? अॅलोपॅथीला २०० वर्षे झाली तरी लिव्हरवर कायमस्वरूपी तोडगा काढता आला का?
४) फार्मा उद्योगात हार्ट ब्लॉकेजचे निराकरण करण्यासाठी काय उपाय आहेत, बायपास, हार्ट ऑपरेशन आणि अँजिओप्लास्टीसाठी कायमस्वरूपी उपाय केले का?
५) हृदयविकारावरील इंजेक्शन, तसेच पेसमेकर न लावता हृदयाची चालना व्यवस्थित होऊ शकेल अशी काही यंत्रणा फार्मा कंपन्यांनी केली आहे का?
६) कॉलेस्टेरॉलचा आजार असलेल्यांचा ट्राइग्लिसराइड्स कमी करण्यासाठी किंवा लिव्हरवर कोणताही दुष्पपरिणाम होणार नाही असा काही शोध लावला आहे का?
७) फार्मा उद्योगाकडे डोकेदुखी आणि मायग्रेनसाठी कायमस्वरूपी उपाय आहे का? एकदा औषध खाल्ल्यावर कायम डोकेदुखी थांबवता येईल का?
८) फार्मा उद्योगात चष्मा आणि श्रवणयंत्र कायमस्वरूपी काढून टाकण्यासाठीचे काही उपाय आहेत का?
९) पायरिया असेल तर दात हालण्याचे बंद होईल तसेच हिरड्यांची मजबूती वाढेल, असे कोणतेही निर्दोष औषध सांगा?
१०) एखाद्या माणसाने शस्त्रक्रिया न करता दररोज कमीतकमी अर्धा ते १ किलो वजन कमी करण्यासाठी काही कायमस्परूपी औषध आहे का?
११) सोरायसिस, सोरायटिक अर्थरायटिस आणि शरिरावरील पांढरे चट्टे कायमस्वरूपी जातील अशी कोणती औषघ निर्मीती केली असेल तर सांगावे.
१२) मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये स्पाँडीलेसिसवर स्थायी समाधान काय आहे?
१३) अॅलोपॅथीसाठी पार्किन्सनवर निर्दोष कायम उपाय काय आहे?
१४) बद्धकोष्ठता, अॅसीडीटीवर फार्मा उद्योगात शाश्वत उपाय आहेत का?
१५) निद्रानाश, झोपण लागणे, यावरील औषधे ४ ते ६ तासच काम करतात, या औषधा दुष्पपरिणामही आहे यावर अॅलोपॅथीमधील काही उपाय?
१६) मनुष्य तणावमुक्त होऊन चांगल्या हार्मोंस वाढवण्यासाठी फार्मा कंपण्यानी काही योजना केली का?
१७) इन्फर्टिलिट कोणत्याही कृत्रिम मार्गांशिवाय करताना वेदना होणार असा मार्ग आहे काय? टेस्ट ट्यूब बेबी ऐवजी नैसर्गिकरित्या मुलांना जन्म देण्यासाठीचे औषध आहे का? असे असेल तर रुग्णांची लाखो रुपयांची बचत होऊ शकते.
१८) फार्मा उद्योगात, वृद्धाप काळात निराशाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठीचे निर्दोष औषध सांगा?
१९) कोणत्याही दुष्परिणामांशिवाय हिमोग्लोबिन वाढविण्याचा अॅलोपॅथीमध्ये औषध आहे का?
२०) मनुष्य खूप हिंसक, क्रूर आहे, यापासून बचाव करण्यासाठी अॅलोपॅथीमध्ये कोणतेही दाखवावे?
२१) सर्व मादक पदार्थांचे व्यसन, अमली पदार्थांचे व्यसन, सोडवण्यासाठी अॅलोपॅथीमध्ये असे कोणतेही औषध दाखवा?
२२) अॅलोपॅथी व आयुर्वेदातील भांडण संपवण्यासाठी फार्मा उद्योगात काही औषध आहेत का?
२३) फार्मा उद्योगात, कोरोना रूग्णाला ऑक्सिजनची गरज भासल्यास कृत्रिम ऑक्सिजन न देता नैसर्गीक ऑक्सिजन वाढविण्याचा कोणताही मार्ग आहे का?
२४) जर पायरिया असेल तर दात हालू नयेत किंवा हिरड्या मजबूत होण्यासाठी कोणतेही निर्दोष औषध सांगा?
२५) अॅलोपॅथ सर्वज्ञानी व उत्तम आहे, म्हणून अॅलोपॅथीचे उपचार करणारे डॉक्टर कधीही आजारी नसावेत?
अशा २५ प्रश्नांचा भडीमार बाबा रामदेव यांनी फार्मा कंपण्यांवर आणि आएमएवर केला आहे. यामध्ये त्यांनी अॅलोपॅथीचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर निशाणा साधला आहे.