‘Yaas’ चक्रीवादळ 12 तासांत भीषण स्वरुप घेणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २५ मे ।यास चक्रीवादळाने बंगालच्या उपसागरात वेग पकडला आहे आणि येत्या 24 तासांत हे चक्रीवादळ बंगाल आणि ओदिशाच्या किनारपट्टीवर आदळण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ तौक्तेनंतर आता आणखी एक मोठे आव्हान भारतासमोर उभे आहे. बंगाल-ओदिशाच्या किनारपट्टी भागात लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू आहे, एनडीआरएफसह इतर बर्‍याच एजन्सींनी मोर्चा सांभाळला आहे.

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मंगळवारी अंदाज व्यक्त केला आहे की चक्रीवादळ ‘यास’ येत्या 12 तासांत ‘अत्यंत भीषण चक्रीवादळा’मध्ये बदलेल. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरातील तीव्र चक्रीवादळ यास गेल्या सहा तासांत सुमारे 9 किमी प्रतितास वेगाने वायव्य दिशेने सरकत आहे.

हवामान खात्यानुसार, हे वायव्य दिशेने वाटचाल करत राहील आणि आणखी वेगवान होईल. 26 मे रोजी सकाळी ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर धडकेल. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 26 मे रोज दुपारी हे अत्यंत भीषण चक्रीवादळाच्या रुपात पारादीप आणि सागर बेटाला बालासोरजवळ क्रॉस करेल. सिस्टम सेंटरवर याची गती सुमारे 55 ते 65 किलोमीट प्रति तास आहे. समुद्राची स्थिती अत्यंत वाईट होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे

ओदिशा, बंगालमध्ये 26 मे रोजी चक्रीवादळ यास धडकण्याची शक्यता आहे. परंतु त्याचा परिणाम मंगळवारपासूनच दिसतो आहे. मंगळवारी ओदिशाच्या बालासोर कोस्टजवळील चांदीपुरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे . येथे समुद्रात उंच लाटा उसळत आहेत. लोकांना समुद्रापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

चक्रीवादळ यास येण्यापूर्वीच एजन्सींनी मोर्चा सांभाळला आहे. बंगाल, ओदिशा येथे एनडीआरएफचे अनेक पथक तैनात करण्यात आले आहेत. लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *