बोर्डाच्या परीक्षा घ्याव्या नाही तर राज्य सरकारने राजीनामा द्यावा ; अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २५ मे । वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारने 10 वी आणि 12 वी च्या परीक्षांबाबत घेतलेला निर्णय विद्यार्थांचं नुकसान करणारा असल्याची टीका केली आहे. बोर्ड परीक्षा सुरक्षितपणे घेता येऊ शकतात. बोर्डाच्या परीक्षा घ्याव्या नाही तर राज्य सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. (Prakash Ambedkar slams Thackeray Government over SSC HSC Board exams)

प्रकाश आंबेडकर यांनी बोर्ड परीक्षांच्या आयोजनांवरुन राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. बोर्ड परीक्षा सुरक्षित वातावरणामध्ये घेता येऊ शकतात. मात्र, राज्य सरकारला त्या घेता येत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

दहावी किंवा बारावीच्या परीक्षा या महत्वाच्या असतात. बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाल्यास तो विद्यार्थ्यांचं नुकसान करणारा असेल, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. बोर्डाच्या परीक्षा सुरक्षित वातावरणात आयोजित केल्या जाऊ शकतात, असं देखील ते म्हणाले.

राज्य शासन दोन दिवसात दहावी परीक्षेबाबत जी आर काढणार
राज्य सरकारचा शिक्षण विभाग दहावीबाबत एक ते दोन दिवसात दोन महत्त्वाचे जीआर काढणार असल्याची माहिती आहे. या शासन निर्णयांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना कसं उत्तीर्ण करायचं याबाबतचे निकष याविषयची माहिती असेल. दुसऱ्या शासन निर्णयात अकरावीचे प्रवेश कसे होणार याचे निकष शिक्षण विभागाकडून जाहीर केले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *