PSI भरती ; मुलाखतीसाठी आता शारीरिक चाचणीत 60 गुण आवश्यक ; MPSC चा मोठा निर्णय,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २५ मे । राज्यातील MPSC ची तयारी करणाऱ्या आणि PSI होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. MPSC ने PSI भरतीबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार PSI पदाची मुलाखत देण्यासाठी शारीरिक चाचणीत 60 गुण मिळवणं आवश्यक असणार आहे. शारीरिक चाचणीत 60 गुण असतील तरंच विद्यार्थ्यांना मुलाखत देता येणार आहे. आता मैदानी गुण फक्त क्वालिफिकेशनसाठी गृहीत धरले जाणार आहेत, तशी माहिती MPSC ने जारी केलेल्या परिपत्रकात देण्यात आलीय. (Important decision of MPSC regarding PSI recruitment)

PSI भरतीसाठी विद्यार्थ्यांना आता MPSC पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि त्यानंतर मैदानी परीक्षेत 60 गुण आवश्यक असणार आहेत. त्यानंतरच या विद्यार्थ्यांना मुखालतीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे. MPSCच्या 2020 मध्ये निघालेल्या जाहिरातीसाठी हा नियम लागू असणार आहे. तशी माहिती MPSC कडून देण्यात आलीय. यापूर्वी शारीरिक चाचणीचे गुण निकालासाठी एकत्रित केले जात होते. मात्र आता अंतिम गुणवत्ता यादीतून शारीरिक चाचणीचे गुण वगळण्यात आले आहेत. हे गुण आता फक्त पात्रतेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे नागरी सेवा परीक्षा 2020 ची मुलाखत पुढे ढकलली आहे. 20 एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत निवेदनातून ही माहिती मिळाली आहे. युपीएससीमार्फत दरवर्षी तीन टप्प्यात सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा घेण्यात येते, ज्यात प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचा समावेश आहे. या माध्यमातून भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) आणि भारतीय पोलिस सेवा (IPS) अधिकारी निवडले जातात.

निवेदनात म्हटले आहे की, मुलाखतीची तारीख आणि भरती परीक्षेची तारीख याबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. आयोगाकडून प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुधारीत कार्यक्रमांबाबत युपीएससीच्या संकेतस्थळावर सूचित केले जाईल. युपीएससीने सोमवारी आपल्या विशेष बैठकीत सांगितले की, वेगाने बदलणारी परिस्थिती, आरोग्याबाबतचे विचार, सामाजिक अंतर राखण्याचे नियम, साथीच्या रोगामुळे उद्भवणार्‍या परिस्थितीचा विचार केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *