महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ मे । गेल्या चार दिवसांपासून स्थिर असलेले सोन्याचे भाव आजही स्थिर आहेत. आज मुंबई आणि पुण्यामध्ये 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,000 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,000 रुपये इतका आहे. चांदीच्या दरात आज 300 रुपयांनी घट झाली असून एक किलो चांदीचा भाव आता 71,200 रुपये इतका झाला आहे.
गेल्या दहा दिवसांचा विचार करता सोन्याचे भाव स्थिर असल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांचा विचार केला तर 20 मे रोजी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,000 रुपये होता, तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 47,000 हजार रुपये होता. त्यानंतर 21 मेपासून 25 मेपर्यंत सोन्याचे भाव स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे.
आज, बुधवारी सकाळी चांदीचा दर प्रतिकिलो 71,200 रुपये इतका आहे. चांदीच्या भावाचा विचार करता गेल्या दहा दिवसात या दरात चढ-उतार दिसत आहे. 16 मे रोजी चांदीचा दर प्रतिकिलो 71,000 हजार रुपये इतका होता. तर 18 मे रोजी तो प्रतिकिलो 74,000 हजारांवर पोहोचला. पुन्हा 19 मेपासून चांदीच्या दरात घट झाल्याचं पाहायला मिळालं. 19 मे रोजी प्रतिकिलो 73,000 रुपये, 20 मे रोजी प्रतिकिलो 72,300 रुपये, 21 मे रोजी प्रतिकिलो 71,200 रुपये, 22 मे प्रतिकिलो 71,100 रुपयांपर्यंत चांदीच्या दरात घट झाली. त्यानंतर 23 मे रोजी चांदीच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली, तर 24 मे रोजी चांदीच्या दरात 300 रुपयांची वाढ झाली होती. आज चांदीच्या दरात 300 रुपयांनी घट झाली आहे.