म्युकरमायकोसिसचा विळखा, ; पुण्यात कोरोनामुक्त नागरिकांचं 1 जूनपासून डोअर टू डोअर सर्वेक्षण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ मे । कोरोनासह आता म्युकरमायकोसीसचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं पुणे महापालिकेनं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुण्यात 1 जूनपासून कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांचं डोअर टू डोअर जाऊन सर्वेक्षण केलं जाणार आहे. तशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलीय. महापालिकेनं कमला नेहरू रुग्णालयात ओपीडी सेंटर तयार केलं आहे. सर्वेक्षणादरम्यान कुणी म्युकरमायकोसिसची लागण झालेल्या रुग्ण आढळल्यास त्याच्यावर दळवी रुग्णालयात उपचार केले जाणार आहे. त्यासाठी दळवी रुग्णालयात स्वतंत्र वॉर्डही तयार करण्यात आला आहे. महापालिकेचे अतिरुक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी ही माहिती दिलीय. (Door-to-door survey in Pune from June 1 against the backdrop of mucormycosis)

पुण्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे. अशावेळी काळ्या बुरशीचा धोका टाळण्यासाठी महापालिका अलर्ट मोडवर आहे. त्याचाच भाग म्हणून 1 जूनपासून संपूर्ण शहरात सर्वेक्षण केलं जाणार आहे. महत्वाची बाब म्हणजे म्युकरमायकोसिसवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना शहरी गरीब योजनेअंतर्गत उपचारासाठी 3 लाख रुपये आर्थिक मदत मिळणार आहे. तशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यापूर्वीच दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *