आता हॉलिवूडमध्येही आपली जादू दाखवणार प्रभास

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ मे ।केवळ देशातच नव्हे तर जगभरात साउथ सुपरस्टार प्रभासची लोकप्रियात पसरली आहे. अगदी कमी काळात बाहुबली फेम प्रभासने देशासह जगभरात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीमध्ये प्रसिद्ध असलेल्या प्रभाससाठी बाहुबली चित्रपट आयुष्यातील नवे वळण ठरले. या चित्रपटानंतर प्रभासच्या चित्रपटांना देशभरातून पसंती दिली जात आहे. आता प्रभासच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता प्रभास आपली जादू हॉलिवूडमध्ये दाखवणार आहे.

सोशल मीडियावर सध्या काही पोस्ट वेगाने व्हायरल होत आहेत. या पोस्टमुळे प्रभासच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. लवकरच प्रभास हॉलिवूडपट ‘मिशन इम्पॉसिबल ७’ मध्ये झळकणार असल्याचा दावा या पोस्टच्या माध्यमातून करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार सुपरहिट फ्रेंचाइसी ‘मिशन इम्पॉसिबल’च्या दोन भागांचे दिग्दर्शन केलेले दिग्दर्शक क्रिस्टोफर मॅकक्वेरी यांनी पुढील म्हणजे ‘मिशन इम्पॉसिबलच्या सातव्या भागासाठी प्रभासशी संपर्क साधला आहे. या चित्रपटातील एका महत्वाच्या भूमिकेसाठी मॅकक्वेरी यांना प्रभासला कास्ट करण्याची इच्छा आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *